जगभर कोरोनाचे सावटअसताना २२ मार्च रोजी सायंकाळी प्रभाकर विठ्ठल उर्फ दादासाहेब नलावडे यांचे निधन हामॅसेज येऊन धडकला आणि मन सुन्न झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची भेट घेण्याचे आम्ही ठरवत होतो. मात्र प्रत्यक्षात त्यांची भेट होऊ शकली नाही. अखेरच्या श्वासापर्यंतते सोशल मीडियावर सक्रिय होते. अनेकांनी हिगोष्ट प्रकर्षाने नमुद केली होती. दादासाहेब नलावडे हे अंबरनाथ मध्ये एक उच्च विद्याविभूषित उत्तम प्रशासक म्हणून गाजलेले व्यक्तिमत्व होते. रत्नागिरी येथून अंबरनाथ येथे येऊन स्थायिक झाले होते. । अंबरनाथ शहराबद्दल त्यांना प्रचंड आपुलकी, जिव्हाळा, प्रेम होते. अंबरनाथच्या कोणतीही बातमी आली किते खुश असायचे. आमचे वडील वसंतराव यांच्याशी त्यांचीघनिष्ठ मैत्री होती. वसंतराव कट्टर समाजवादी आणि दादासाहेब हे कट्टर काँग्रेसवाले. तरीही त्या दोघांची वेगळी मैत्री होती. मैत्री कशी असावी हे त्यांच्याकडून शिकावे अशी त्या दोघांची मैत्रीहोती. आम्ही १९१९ साली पाचीन शिवमंदिराजवळ परुषोत्तम वासदेव उर्फ भाऊसाहेबपरांजपे यांच्या चाळीत रहायला गेलो. त्या वर्षांपसून नेहमी आम्ही पहात होतो कि दर वर्षीमहाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी स्टेशन ते शिवमंदिर या रस्त्याचे डांबरीकरण केले जायचे. दादासाहेब नलावडे हे नगराध्यक्ष झाल्यावर त्यांनी या शिवमंदिर रस्त्याचे डांबरीकरणाचाठेका देताना निविदेत एक महत्वपूर्ण अट घातली होती ती म्हणजे जो ठेकेदार रस्त्याचं काम करताना दहा वर्षाची खात्री देईल त्यालाच काम दिले जाईल. आणि अक्षरशः दहा वर्षे काय तो रस्ता किमान वीस वर्षे तरी चांगला होता.
त्याच धर्तीवर त्यांनी शहरातील सर्व रस्ते चांगल्या दर्जाचे केले होते. पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कामगारांसाठी निवसी संकुल आणि शहरासाठी परिवहन सेवा सुरु करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र त्यांच्याच पक्षाच्या असंतुष्टांच्या गलिच्छ राजकारणामुळे दादासाहेब नलावडे यांची पालिकेतील लोकप्रतिनिधींची सत्ता संपुष्टात येऊन पालिका बरखास्त करण्यात आली. १९७८ मध्ये पालिका बरखास्त झाल्यावर १९९५ पर्यंत अंबरनाथ शहरात प्रशासकीय राजवट राहिली होती. १० मे १९९५ रोजी पालिकेत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींची सत्ता आली. १९७४ मध्ये दादासाहेब नलावडे हे थेट नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या पोटनिवडणुकीतप्रचंड मतांनी निवडून आले होते. पालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत नव्हते. काठावर सदस्य काँग्रेसचे होते मात्र त्या काळात त्यांच्या दूरदृष्टीच्या विकास कामांच्या दृष्टीला शिवसेनेसहित सर्व पक्षीय नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याकाळातील शिवसेनेचे शहर प्रमुख आणि शिवसेनेचे गटनेते शांताराम जाधव यांनी काँग्रेसच्या प्रभाकर नलावडे याना पाठिंबा दिला होता. त्याकाळात खरी काँग्रेस व शिवसेनेची विकास आघाडी झाली होती. त्यामुळे न भूतो अशी प्रचंड विकास कामे चार वर्षात झाली होती.
अतिशय कडक शिस्तीचे रोखठोक स्वभावाचे आणि तितकेच प्रेमळ असा त्यांचा स्वभाव होता. सर्वाना मदत करण्याची त्यांची सवय होती. आणीबाणी मधील एककिस्सा मला आठवतो. आमच्या घरी माझेआई, वडील, मोठे बंधू योगेश आणि मी आम्ही सर्वजण भूमिगत राहुन आणीबाणी विरोधातील चळवळीत सक्रिय सहभागी होतो. म्हणजे आहुति मधून आणीबाणीची प्रशंसा करायची आणि मुद्रणालयातून आणीबाणी विरोधात बुलेटिन छापून वितरित करीत असू. एकेदिवशी मुंबई येथून विशेष पथक आमच्या घरी धाड टाकायला येणार होते. अर्थात तसे ते आलेही मात्र त्यातून आमच्या कुटुंबाची सहीसलामत सुटका झाली ती दादासाहेब आणि वडिलांचे पोलीस खात्यातील एका मित्रांमुळे. अन्यथा त्या काळात आमचे पूर्ण कुटुंबतुरुंगात गेले असते. माजी मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांचे लहान वृत्तपत्रे जगावी हे जसे धोरण होते तसेच दादासाहेबनलावडे यांचेही तसेच धोरण होते. ते नगराध्यक्ष असतांना त्यांनी पालिकेत एक धोरण ठरवले होते पालिकेची प्रत्येक जाहिरात शासन मान्ययादीवरील प्रत्येक साप्ताहिकाला आणि राज्य तसेच जिल्हा स्तरीयदैनिकांना रोटेशनने जाहिरात देण्यात यायची. दादासाहेब हे रोटरीचे अध्यक्ष होते तर त्यांचे बंधू एकनाथ उर्फ भाई नलावडे लायन्स क्लब चे सदस्य होते. एकनाथ नलावडे हे कालांतरानेअंबरनाथ सोडून रत्नागिरी येथे स्थायिक झाले. तेथे ते लायन्स क्लबचे गव्हर्नर सुद्धा झाले. रत्नागिरी येथे लायन्स क्लबच्या माध्यमातूनडोळ्यांचे भव्य रुग्णालय उभारण्यात एकनाथ नलावडे यांचा मोलाचा वाटा होता. दोघेही बंध समाजसेवेत अग्रणी होते. दादासाहेब यांच्या पत्नी शोभना या सुद्धा राजकारण आणि समाजकारणात सक्रिय होत्या.
अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी यशस्वी पणे सांभाळली होती. शोभनाताई यांचे काली निधन झाले तसेच त्यांचेज्येष्ठ चिरंजीव बाबा याचेही अकाली निधन झाले. या दोन मानसिक धक्याने दादा खचले होते. गेल्या काह वर्षणापासून ते दुसरा मुलगा प्रशांत यांच्याकडे वास्तव्याला होते. "घार हिंडते आकाशीपरी लक्ष तिचे पिला पाशीह उभया उक्ती प्रमाणे दादा जरी तनाने पुण्याला वास्तव्यास गेले तरीही त्यांचे मन अंबरनाथ मध्येच होते. अंबरनाथ मधील अनेकांशी त्यांचा रोजचा संपर्क होता. अंबरनाथमधून कोणीही भेटले किंवा फोन जरी केला तरी दादा प्रचंड खुश व्हायचेअसाच एक किस्साआठवतो. काही वर्षांपूर्वी अंबरनाथचे आम्ही काही पत्रकार लोणावळा येथे फिरायला गेलो होतो. लोणावळा येथील दुपारचे भोजन आटोपल्यावर, आपण दादांना भेटायला जाऊ या असा प्रस्ताव मांडला आणि सर्वानीच तो उचलून धरला. मग काय आम्ही प्रशांतला म्हणजे त्यांच्या मुलाला फोन केला कि आम्ही लोणावळा येथून निघत आहोत. दादांना भेटायला येत आहोत पण दादांना न सांगता अचानक भेट द्यायची असे ठरले आहे. प्रशांत सुद्धा खुश झाला. तोही कामावरून रजा घेऊन लवकर घरी आलाआम्ही सर्व पत्रकार एका मागून एक दादांच्या घरात गेलो. सर्वाना पाहून दादा प्रचंड खुश झाले. सर्व पत्रकार एकत्र भेटल्याने दादांना प्रचंड आनंद झाला. दोन तास मनमोकळ्या गप्पा मारून आम्ही त्यांच्या घरून निघालो.त्यावेळी दादा स्वतः खाली उतरून निरोप द्यायला आले होते. खाली सोसायटीमधील काही पदाधिकारी भेटले.त्यांची आमच्या सर्वांबरोबर ओळखही करून दिली होती.त्यावेळी दादांना पाहून प्रशांत म्हणाला आज दादा प्रचंड खुश झाले आहेत. अंबरनाथचे सर्व पत्रकार एकत्र येऊन अचानक भेटलेत्यामुळेत्यांना एक महिन्याची एनर्जी मिळाली आहे. ___ दादासाहेबांच्या आठवणी अजूनही मनात दाटून येतात इतक्या प्रचंड आठवणी मनात दाटून आल्या आहेत. पणजागेअभावी येथेच थांबतो. दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळोहीच शिवचरणी प्रार्थना ! नलावडे कुटुंबियांच्या दुखत आहुति आणि त्रिवेदी परिवार सहभागीआहे.