अंबरनाथ जयहिंद बँकेच्या कर्मचायाना सुरक्षा कवच चे वाटप

अंबरनाथ (प्रतिनिधी): कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या संसर्गापासून बँकेच्या अधिकारी आणि कर्मचार्याच्या सुरक्षेसाठी अंबरनाथ जयहिंद बँकेतर्फे कोरोना बचाव संरक्षण किटचे वाटप करण्यात आले. असे कोरोना बचाव किट बँकेच्या कर्मचार्याना देणारी अंबरनाथ जयहिंद बँक हि भारतामधील प्रथम बँक आहे. अंबरनाथ जयहिंद बँकेच्या शिवाजीनगर शाखेत हा सरक्षा कवच वाटपास सुरुवात करण्यात आली. स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या आले बँकेच्या अधिकारी आणि कर्मचार्याना देखील कोरोनापासून सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचेआहे व या मुळेच कर्मचार्याना कोरोना बचाव संरक्षण किटचे वाटप करण्यात आले असल्याचे अंबरनाथ जयहिंद बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव देसाई यांनी सांगितले. अंबरनाथ जयहिंद बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी देशाच्या प्रत्येक लढाईत सक्रिय सहभागी असतात. नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोरोना सारखी महामारी, बँकेचे अधिकारी सदैव सेवेत असतात. नागरिकांना चांगली सेवा देणाया या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा असल्याने त्यांना कोरोना सुरक्षा कवच देण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे बँकेच्या सांचालक सौ. रूपा देसाई जगताप यांनी सांगितले विशेष म्हणजे हे सर्व किट बँकेच्या निधीमधून खर्च करता संचालक मंडळाने त्यासाठी निधी उपलब्ध केला असल्याचे रूपा देसाई जगताप यांनी सांगितले. सर्वप्रथम बँकेच्या सर्व शाखांमधील कॅशियरना हे सुरक्षा कवच देण्यात येणार आहे. याचे कारण वॅशियरचा थेट नागरिकांशी संबंध येत असतो. जस जसे हे कवच उपलब्ध होतील तसे सर्व आधिकारी आणि कर्मचाऱ्यानादेण्यात येणार आहे.


हे सुरक्षा कवच धुवून वापर करता येण्यासारखे तयार करवून घेतले असल्याचेही रूपा देसाई जगताप यांनी सांगितलेबँकेच्या अठरा शाखांमधील सर्व १६५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे सुरक्षा कवच देण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष एड. नंदकुमार भोळे यांनी सांगितले. अंबरनाथ जय हिंद बाँकेच्या या उपक्रमामुळे बॅकेच्या संस्थापक व अध्यक्ष विलास देसाई आणि बँकेच्या सर्व संचालक मंडळाचे कौतुक होत आहे. अंबरनाथ जयहिंद बँकेच्या शिवाजीनगर शाखेत हा सरक्षा कवच वाटपास सुरुवात करण्यात आली. स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या शुभहस्ते हे वाटप करण्यात आले. जयहिंद बँकेने खरोखरच हा स्तुत्य आणि अनुकरणीय असा उपक्रम हाती घेतला आहे. हे सुरक्षा कवच अत्यंत चांगल्या दर्जाचे आहे. येत्या काळात कोरोनाचा हा धोका वाढण्याचीशक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बँकेने सुरक्षा कवच देण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य असल्याचे आमदार बालाजी किणीकर यांनी सांगितले. सदर सुरक्षा कवचचे वाटप करताना माजी नगराध्यक्ष सनील चौधरीबँकेचे उपाध्यक्ष एडनंदकुमार भोळे, संचालक सौ.रूपा देसाई-जगतापसंदीप जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेदपाठक, मुख्य व्यवस्थापक व्यंकटेश इटे, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते