अनिल गायकवाडयांची समाजसेवा

अंबरनाथ (प्रतिनिधी): आपत्कालीन परिस्थितीत जो जनसेवेसाठी पुढे सरसावतो तोच खरा जनसेवक. आजच्या संचार बंदीच्या काळातही येथील डेनएबीसी केबल चे संचालक अनिल गायकवाड यांनी अन्नदानाचे आपले व्रत कायम ठेवल्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदाआला. अनिलदादा हे कार्य गेली किमान पंधरा वर्षे करीत आहेत. नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोणताही अपघात असो. अडचणीत सेवा बजावणार्यांना दोन वेळेस ताजे गरमागरम अन्न देण्याचे हे त्यांचे व्रत आजही सुरुआहे. ज्या शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर यंत्रणा सुरू आहे त्या यंत्रणेच्या सोयीसाठी अंबरनाथ मधील डेन एबीसी केबल चे संचालक अनिलदादा गायकवाड यांनी सर्वांच्या अपेक्षांना बगल देत जनसेवेसाठी उपक्रम राबविला. जनतासंचारबंदीदरम्यान कर्तव्यावर असलेले अंबरनाथ पोलिस स्टेशनचे कर्मचारी, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वाहतूक पोलीस, अंबरनाथ पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी, मेडिकल स्टोअर मधील कर्मचारी आणि कर्तव्यावर असलेले अंबरनाथ मधील पत्रकार यांच्या जेवणाची सोय योग्य पद्धतीने करण्यात आली. शासकीय यंत्रणा चालवणायाअधिकारी आणि कर्मचायांना किमान पोटभर जेवण देण्याचा हा उपक्रम त्यांनी कायम ठेवला. २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुरानंतर तब्बल पंधरा दिवस अनिल गायकवाड यांनी बदलापूर आणि आसपासच्या गाव पाड्यात रोज दुपारी आणि रात्री गरमागरम भोजनाची व्यवस्था केली होती. अगदी गेल्या जुलै महिन्यात आलेल्या महापुरात तर अनिल गायकवाड आणि त्यांची टीम थेट कोल्हापूर येथेही पोहोचली होती. त्यांच्या टीम मधील किरण सासे यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस नेमका त्याच दरम्यान होता. पहिला वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचा मनोदय असताना हा महापूर आला होता. त्यामुळे त्यांनी वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा न करताकोल्हापूर येथील वीस कुटुंबाना महिनाभर पुरेल इतके धान्य अनिल गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात आले होते. आनिल गायकवाड हे दर वर्षी जन्माष्टमी मोठ्या धुमधडाक्यात साजरी करीत असतात. जन्माष्टमीला कार्यालयात सत्यनारायणाची महापूजा आणि कालाष्टमीला भव्य दही हंडी चा उपक्रम राबवित असत. दही हंडीला त्यांनी बाजारू स्वरूप अजिबात येऊ दिले नाही. तर श्रद्धा म्हणूनच ते हा सण साजरा करीत. त्यावेळी लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करून येणाया प्रत्येक बाळकृष्णाला भरीव बक्षीस ते देत असत. आठ थरांची सलामी देणार्यांनाही भरीव बक्षीस तर देतच शिवाय अन्नदान हि करीतअसत. या दिवशी लाखो रुपये खर्च होत असत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी हा कालाष्टमीचा उत्सव रद्द करून डॉ. राहुल चौधरी यांच्या स्पंदनफाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू मुलांच्या शालेय साहित्यासाठी हा निधी ते देत आहेत. अनिलदादा गायकवाड यांनी राबविलेला आजचा उपक्रम हा कौतुकास्पदच नव्हे तर दिशा दर्शकचम्हणावा लागेल.