१९७३ साली मुलुंडची औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १९७५ ते १९७८ पर्यंतच्या चर्नी रोड येथील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयातून मुद्रणकलेचे प्रशिक्षण पूर्ण केले. यावेळी मी नवशक्ति चा अंबरनाथ चा बातमीदार होतो. मुद्रणकलेचे शिक्षण घेतल्याची माहिती आमचे नानूकाका म्हणजे बाळकृष्ण भट्ट यांनी अंबरनाथ च्या स्वस्तिक हाऊसहोल्ड अँड इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आर. व्ही. जोशी यांच्या कानी घातली होती. त्यांनी माझे मानलेले मामा मोतीलाल तांबोळी यांच्या मार्फत मला नोकरी साठी निरोप पाठवला. सुरुवातीला मी फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. पण वारंवार निरोप येऊ लागल्याने मी त्या नोकरी चा स्वीकार केला. बाळकृष्ण भट्ट हे स्वस्तिक मध्ये स्टोअर कीपर होते. अरुणभाई पंड्या, नानूकाका यांचे बंधू सुद्धा तिथेच होते. तांबोळी मामा विम्को या काडीपेटी बनविणण्या कंपनीत होते. बाळकृष्ण भट्ट आणि माझे वडिल वसंतराव त्रिवेदी यांचे सहकारी होते आणि त्रिवेदी भट्ट हे दोन्ही कुटुंब यांचे घरचे संबंध आहेत. स्वस्तिक कंपनीच्या आत मुद्रणालय होते. ती सुद्धा एक कंपनीच होती. पॅकआर्ट हे त्या कंपनीचे नाव.
या कंपनीत मी १९७९ साली प्रिटिंग सुपरवायझर म्हणून नोकरीला लागलो. अर्थात माझी पत्रकारिता सुरुच होती. पॅकआर्ट मध्ये एका व्यक्ती च्या हट्टापायी मला दिवसपाळी वर पाणी सोडावे लागले. कारखान्यात तीन पाळ्या असतात पण माझ्या वाट्याला दुपारी साडेतीन ते रात्री साडेदहा आणि रात्री साडेदहा ते सकाळी आठ अशा दोनच पाळ्या आल्या. एका सहकायावरील अन्याय सहन न झाल्याने १९८४ साली मी नोकरीवर पाणी सोड्न पन्हा पर्णवेळ पत्रकारिता करु लागलो. पण पॅकआर्ट च्या नोकरीत तीन सहकारी लाभले जे जीवश्च कंठश्च मित्र झाले. एक प्रदीप वेर्णेकर, दुसरा कुबेर सँम्युएल आणि तिसरा विजय भास्कर शिंदे. वेर्णेकर तर माझा अंबरनाथ च्या महात्मा गांधी विद्यालयाचा वर्गमित्र. प्रदीप आणि दिगंबर हे वेर्णेकर बंध आम्ही एकत्रच शिक्षण घेतले. विजय भास्कर शिंदे आणि मी आम्ही दोघेही 6 एकत्रच दुस्रया आणि तिस्रया पाळीत काम करीत असू. विजय शिंदे हे प्रशासकीय अधिकारी म्हणून पर्योनेल डिपार्टमेंट मध्ये असायचे. टाईम कीपरचं काम संपलं की ते आणि मी एकत्र बसायचो. मी पत्रकारिता करीत असल्याने मी तिथे रात्रपाळीत लिखाण करीत असे आणि माझ्या लिखाणाचा पहिला वाचक विजय शिंदे. तृप्ती या माझ्या बहिणीचा विवाह समारंभ दणक्यात झाला. त्यावेळी माझ्या मामे बहिणी नीता आणि यगल तसेच मावसबहिण रुपल हे एक महिना अंबरनाथ ला होते. लग्नसमारंभ दणदणीत पार पडल्यानंतर माझ्या मामेबहिणी आणि मावसबहिण त्यांच्या त्यांच्या घरी गेले. त्यांच्या बद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी । मी रात्रपाळी मध्ये वृत्तपत्राच्या दोन पानांच्या आकाराची दोन पत्रे लिहिली. त्या पत्रांचे साक्षीदार अर्थातच विजय शिंदे होते. एवढी मोठमोठाली पत्रे पाहून विजय शिंदे आणि माझ्या परिवारातील सगळेचजण आश्चर्यचकित झाले.
विजय शिंदे यांची जन्मतारीख तीन चार पाच सहा अशी ते नेहमी सांगतात. रत्नागिरी र जिल्ह्यातील खेड या गावी ३ एप्रिल १९५६ रोजी जन्माला आलेल्या विजय शिंदे यांचे पिताश्री भास्करराव शिंदे हे भारतीय लष्कराच्या सेवेत होते. १९७७ साली सेवानिवृत्त झाल्यावर भास्करराव मुंबईत परळ ला भावाबरोबर रेल्वेच्या वसाहतीत वास्तव्यास होते. परळ नायगाव हा समाजवादी लोकांचा बालेकिल्ला होता. महाराष्ट्र माऊली पांडुरंग सदाशिव उर्फ साने गुरुजी हे डिलाईल रोडला साधना साप्ताहिक या महत्त्वाच्या समाजवादी विचारसरणीला वाहिलेल्या अंकाच्या कार्यालयात बसत असत. साने गुरुजी यांनी साधना ची स्थापना केली भीमराव सतबाजी केसरकर हे समाजवादी कार्यकर्ते या ठिकाणी सतत कार्यरत होते. सुरेश तावडे, सधाकर वावीकर कष्णाजी ठाकूर आदी समाजवादी मंडळींच्या सान्निध्यात शिंदे परिवार आला. त्यातूनच विजय शिंदे यांच्यावर राष्ट सेवा दल. समाजवादी विचारसरणीचा प्रभाव पडला. कृष्णाजी ठाकूर यांचे चिरंजीव उमेश आणि विजय शिंदे यांची मैत्री झाली आणि मग जी. जी. पारीख, गजानन खात्, दत्ताराम चाळके आदी नेते यांच्या नेतृत्वाखाली या भागात झपाट्याने काम सुरु झाले. सुपारीबाग सहकारी संस्था, अपना बाजार, अपना बँक या संस्थांवर समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अधिराज्य गाजविले. त्यात विजय शिंदे हे मग सुपारीबाग सहकारी संस्थेचे अध्यक्ष झाले.
आधी मी अंबरनाथ येथे रहात असतांना विजय शिंदे हे कांजूरमार्गला रहात आणि मग त्यांचा १९८८ साली विवाह झाल्यावर सौ. शैलजा आणि विजय शिंदे हे १९९६ साली चारकोप, कांदिवली येथे तर मी १९९७ साली बोरीवली येथे वास्तव्यास आलो. आम्ही आमचा संपर्क आणि संबंध कायम ठेवला. योगायोगाच्या गोष्टी म्हणजे १९८५ ते १९८८ या काळात मी मुंबई सकाळ चा बातमीदार होतो तेंव्हाचे विजय वैद्य, अनिल जोशी, राजन चव्हाण हे पुन्हा एकदा विजय शिंदे यांच्या सहवासात आलो. पर्योनेल डिपार्टमेंट मधील विजय शिंदे यांच्या कामाचा अनुभव विजय वैद्य, अनिल जोशी, संजय डहाळे, दिलीप ठाकूर अशा आम्हा मित्रमंडळींना कामाला आला. भविष्य निर्वाह निधी च्या निवृत्तीवेतनासाठी कांदिवली येथील कार्यालयात आम्हाला विजय शिंदे यांनी खूप मदत केली. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात अध्यक्ष म्हणून राजन चव्हाण आणि कार्यवाह म्हणून मी एकत्र काम केल्यामुळे तसेच १९८५ पासून राजन चव्हाण यांच्या बरोबर मुंबई सकाळ मध्ये मी काम केले असल्याने चव्हाण हेही विजय शिंदे यांच्या सान्निध्यात आलेआपण म्हणतो नां की लग्नाच्या गाठी या परमेश्वराने बांधन ठेवलेल्या असतात. शैलजा आणि विजय शिंदे यांची जाहार सुकन्या अंकिता हिचा विवाह शुभांगी आणि राजन चव्हाण यांचे सुपूत्र तेजस यांच्या समवेत झाला. सौ. शुभांगी चव्हाण आणि सौ. शैलजा शिंदे या दोघीही मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासकीय सेवेतून त्या सेवानिवृत्त झाल्या. चव्हाण शिंदे व्याही झाले. आधी मुंबईत वास्तव्यास असलेले चव्हाण कोकणात ओरोस येथे स्थायिक झाले.
सहकार आणि समाजवादी चळवळीचा अनुभव गाठीशी असल्याने विजय शिंदे यांचे सामाजिक कार्य चारकोप येथेही सुरु आहे. उमेश ठाकरअरुण निबाळकर, पद्यनाभ भिडे, भास्कर धुमाळ आदींसमवेत सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच विविध संस्था यांचा कारभार सहकार विजय शिंदे हे यशस्वीपणे करीत आहेत. जुन्या सहकायाशी त्यांचे संबंध आजही अबाधित आहेत, ज्यात वेर्णेकर, नाईकमालुसरे, काका थोरवे यांचे चिरंजीव हेमंत यांचाही समावेश मालुसर, का आहे. वडिल भास्करराव हे लष्कराच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्यावर स्वस्तिक मध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांचे देहावसान झाले. सहकारी आणि समाजवादी चळवळीत असले तरी विजय शिंदे हे तथाकथितभासमा भोंदू समाजवादी निश्चितच नाहीत. स्वामी समर्थ यांचे ते कट्टर न भक्त आहेत आणि गणपती, होळी या सणावाराला ते न चुकता मुबईतील सर्व चाकरमान्यांप्रमाणेच सहकुटुंब कोकणात गेल्या शिवाय रहात नाहीत. दहागाव चिपळूण येथेही तुषार शिंदे त्व त्यांचे परिवारातील सदस्य क्रीडा व अन्य सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांचे चुलतभाऊचंद्रकांत शिंदे हे शिक्षण क्षेत्रात कायरत असून वामनराव प या कार्यरत असून वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचे कार्यकर्ते आहेत. जीवनविद्या मिशन आणि समाजवादी चळवळ/ सामाजिक कार्य यामुळे प्रा. सौ. नयना रेगे, सौपळवा रेखाताई बोहाडे, मोहिनी अणावकर, विजय वैद्य आणि मी अशा आमच्या परिवारात शैलजा वहिनींसमवेत विजय शिंदे आणि त्यांचा परिवार एकरुप झालाय.
या निमित्ताने राजन चव्हाण आणि सौ. शुभांगी चव्हाण हेही आमच्या आहुति परिवारात पूर्वीपेक्षा घट्ट जोडले गेले आहेत. आहुति चा किंवा आमच्या कौटुंबिक कोणत्याही कार्यक्रमास शिंदे परिवाराची उपस्थिती निश्चितच राहिली आहे. मग तो कार्यक्रम अंबरनाथ येथे असो किंवा सुरतेला, विजय शिंदे हे आपुलकीने हजेरी लावतातकिवा सुरतला, अशा आमच्या मित्रवर्य विजय शिंदे यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, ही स्वामी समर्थ चरणी विनम्र प्रार्थना !