अन्वयच्या "चांद्रयान-२" चे उड्डाण यशस्वी आठ वर्षाच्या अन्वयचा सुट्टीतील प्रयोग

अंबरनाथ (प्रतिनिधी):  दुसऱ्या इयत्तेत शिकणारा अन्वय अमेय गोगटे याने त्याची आई आरती गोगटे यांच्या मदतीने टाकाऊ वस्तूंपासून घरच्या घरी "चांद्रयान-२" ची प्रतिकृती तयार केली. दोरीच्या सहाय्याने या चांद्रयानाने घरातल्या घरात उड्डाणही केले. आणि हे उड्डाण यशस्वी झाल्यावर अन्वय आणि त्याची आई आरती यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आपली कोरोनाची सुट्टी सार्थकी लागल्याचे समाधान त्यांच्या चेहयावर झळकत होते. "कारोना” संकटामुळे होळीपासूनच उन्हाळी सुट्टीचा लाभ झालेल्या शालेय मुलांपुढे काही पालकांनी सकारात्मक आणि कल्पक उपक्रमात गुतवून त्यांचा वेळ सत्कारणीलागेल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अंबरनाथ येथील गोगटे कुटुंबिय अशांपैकीच एक. येथील आर्य गुरूकुल शाळेत दुस्रयाइयत्तेत शिकणारा अन्वय अमेय गोगटे याने त्याची आई आरती गोगटे यांच्या मदतीने टाकाऊ वस्तूंपासून घरच्या घरी "चांद्रयान-२” ची प्रतिकृती ची पतिकती तयार केली. दोरीच्या सहाय्याने या चांद्रयानाने घरातल्या घरात उड्डाणही केले. हे उड्डाण यशस्वी झाल्यावर चंद्रावरपहिला पाय ठेवणाया निल आर्मस्ट्राँग ला जसा आनंद झाला तसाच काहीसा आनंद अन्वयला झाला तर नवल वाटायला नको. अन्वयला अवकाश यान विषयात खूप आवड आहेआणि त्याची आई हस्तकलेत _पारंगत आहेत. त्यामुळे या मायलेकांनी एकमेकांच्या आवडीतून चांद्रयानाची प्रतिकृती साकारली. सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे घरात उपलब्ध त्यामळे घरात उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिकच्या _डब्या, पेव्ही कॉलच्या बाटल्या, निकामी रिमोट कंट्रोल, आदी वस्तूंचावापर करून ही “चांद्रयान-२' चीप्रतिकृती साकारण्यात आली. “कठपुतली' च्या खेळात ज्याप्रमाणेदोरीच्या सहाय्याने बाहुल्या नाचवतो, त्याच पद्धतीने दोरी द्वारे या चांद्रयानाचे उड्डाण होते. मंगळवारी सकाळी अन्वय च्या या "चांद्रयान-२" चे अंबरनाथ येथील नासाच्या केंद्रातून यशस्वी उड्डाण झाल्याची सचित्र वार्ता समाजमाध्यमातून घराघरात पोहोचली आणि अनेकांअन्वय आणि त्याची आई आरती यांचे कौतुक केले. काहींनी फोन करून गोगटे कटंबियांकडन "चांद्रयान-२” बनविण्याची पद्धत समजून घेतली. घरच्या घरी तयार केल्या जाऊ शकणाऱ्या अशा प्रकारच्या ज्ञानरंजक प्रकल्पाचे अनेकजण कौतुक करीत आहेत.