संपादकीय साठी ओलांडलेल्या रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ चे तरुण तडफदार अध्यक्ष रोटेरियन दीपक रामकृष्ण रेवणकर यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य लाभो, त्यांच्या मनातली सर्व संकल्पना पूर्ण होण्यासाठी आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सांघिक शक्ती मिळो हीच शिवचरणी मनापासून प्रार्थना! दिपकच्या लहानपणीच त्याचे पितृ छत्र हरपले. आईएड. शशिकला रेवणकर यांनी पतींच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतः शिकून आपल्या दोन्ही मुलांना चांगली शिकवणूक, संस्कारासह पदवीपर्यंतचे शिक्षणही दिले. दीपकच्या या कठोर वाटचालीचा काही अंशी मी सुद्धा साक्षीदार आहे. त्याची वाढत चाललेली कमान पहाताना मनाला समाधान वाटते. काही वर्षांपूर्वी दीपक खरेच इतकी उंच भरारी घेईल का अशी मनात थोडी खंतवाटत असताना आमचे गुरुजी विश्वनाथनारायण भागवत उर्फ भागवत गुरुजी यांनी त्यावेळी स्पष्ट शब्दात सांगितले होते, कि दीपकचा भविष्य काल अतिशय उज्ज्वल आहे. आणि आज त्याची हि भरारीपहाता भागवत गरुजींचे भविष्य खरे झाल्याचे समाधान लाभत । आहे. मनस्वी आनंद होत आहे. आम्हा त्रिवेदी कुटुंबियांना इतका आनंद होत असेल तर त्यांच्या मातोश्री एड. शशिकला रेवणकर उर्फ रेवणकर ताईंनासुद्धा निश्चित आनंदहोत असेल यात दुमत असण्याचे कारण नाही. _इंजिनियर होताना कधी नोकरी तर कधी व्यवसाय अशा व्दिधामन:स्थितीत दीपक असतानात्याने स्वत:चा उद्योग सुरु केला. विजेचा होणारालपंडाव पाहून त्याने स्वतः इन्व्हर्टर बनविण्याचा व्यवसाय सुरु केला.हा व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यावर त्याने दुसरे पाऊल टाकले ते सौर उर्जेवर व्यवसाय करण्याचा. डॉ. अनिल काकोडकर म्हणतात त्याप्रमाणे, म्हणजे आपल्या देशात सौर उर्जे सारखी श्रीमंती अन्य कोणत्याही देशात नाही. हि श्रीमंती आपल्या देशात विकसित करण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा. याचे कारण म्हणजे आपल्या देशात कोळशावर वीज निर्मिती भविष्यकाळात अतिशय अवघड जाणार असल्याने जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर व्हावा असे डॉ. अनिल काकोडकर यांनी वेळोवेळी आवाहन केले आहे. दिपकने सौरऊर्जेचा अभ्यास केला. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचाही अभ्यास केला. आणि त्याने स्वत: सौर ऊर्जेचा वापर करण्याचे निश्चित केले. दीपकने लोणावळा येथे जलबेराच्या शेतीला आवश्यक असलेला गारवा हा सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा वापर करून यंत्रणा यशस्वी केली. हा प्रयोग त्यावेळी आम्ही स्वतः पाहिला होता. असे एका पेक्षा एक प्रयोग त्याने यशस्वी केले. इतकेच नव्हे तर आफ्रिकेच्या एका भागात जिकडे वीज म्हणजे काय याची कल्पनाही नव्हती तर नळाला पाणी येणे हि कल्पनाच त्या भागात नव्हती.
त्या अतिशय दुर्गम अशा आदिवासी व अत्यंत मागासलेल्या भागातील नागरिकांना सौर ऊर्जेचा वापर करून तिकडे वीज उपलब्ध करून दिली. इतकेच नव्हे तर सौर उर्जेवर कूपनलिका बसवून त्यांना आपल्या घराजवळ पाणी पुरवठा सुरु करून दिला. ज्यावेळी या कुनलिकेतून धो धो पाणी वाहू लागले त्यावेळी त्या आदिवासी बांधवांच्या आणि खास करून भगिनींच्या चेहयावर दिसणारा वेगळा आनंदहा पैशांमध्ये मोजता येणारा नाही. । 'असे अनेकानेक प्रयोग यशस्वी करताना स्वत:चा व्यवसाय वाढवतानाच महत्वाचे म्हणजे त्याने आपला पूर्वेइतिहास अजिबात विसरला नाही. आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत, आणि यापुढेही राहतील अशी आशा नव्हे खात्री बाळगायला काहीही हरकत नाही. आपल्या देशातील अतिशय यशस्वी उद्योजक पदमश्री रतनटाटा यांचा आदर्श त्याने आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे. आपल्या पहिल्या उत्पनातील काही भाग हा समाजासाठी देण्याचा त्याचा संकल्प आहे. आणि तो त्याने प्रत्यक्षात आणलेला आहे हे विशेष. त्याने । नवीन तंत्रज्ञान वापरून विजेचे दिवे तयार केले त्यातील असंख्य दिवे त्याने शाळांमधून वाटले आहेत. इन्व्हर्टर ची निर्मिती करतानाही त्याने काही इन्व्हर्टरहे। शाळांमध्ये बसविले. आता त्याने सौर उर्जेवरचे प्रकल्प तयार केले तेही त्याने शाळांमध्ये बसविले आहेत. आता तर तो गेले वर्षभर रोटरी क्लबचा अध्यक्ष आहे. या काळात रोटरी क्लबच्या माध्यमातून पाच शाळांमध्ये सौर उर्जेवर चालणारी यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे त्या शाळांच्या विजेच्या बिलाच्या रकमेची बचत होणार असून शाळेला एक प्रकारे फायदाच होणार आहे. वास्तविक दीपकच्या या कार्याचा आढावा तो अध्यक्ष पदाची धुरा घेतांना किंवा पदावरून निरोप घेतांनाघ्यायचे ठरवले होते. मात्र आज त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा आढावाघेण्याचा प्रयत्न केला आहे. रोटरी क्लबच्या अध्यक्षांच्या बाबतीत लिहिताना एकेरी मध्ये दीपकचा उल्लेख केला आहे. याचे कारण म्हणजे दीपक भाचा आहे. आज त्याच्या या "यशा"त आई एड. शशिकला आणि पत्नी सौ. दीपा चा निश्चितच वाटा आहे. म्हणूनच त्याच्या या कार्याचा सर्वत्र "गौरव" होत आहे हे नक्कीच. (दिपकच्या मोठ्या । चिरंजीवाचे नाव गौरव तर लहानचिरंजिवांचे नाव यश आहे.) __पुनश्च एकदा रोटेरियन दीपक रेवणकर याला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य व ठणठणीत आरोग्य लाभो. त्यांच्या मनातील सर्व संकल्पना पूर्ण होण्यासाठी आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सांघिक शक्ती मिळो हीच शिवचरणी मनापासून प्रार्थना!