दादासाहेबः फेंड, फिलॉसॉफर आणि गाईड

प्रभाकर उर्फ दादासाहेब नलावडे यांचं रविवारी २२ मार्च रोजी सायंकाळी पुणे मुक्कामी निधन झाल्याचं कळल्यानं अतिशय वाईट वाटलं ! अंबरनाथमधल्या त्यांच्या दीर्घकाळच्या वास्तव्यात त्यांनी केलेली समाजसेवा फार मोलाची होती .लाल मातीचे रस्ते असलेल्या अंबरनाथचा कायापालट करण्यासाठी , नगराध्यक्ष या नात्यानं त्यांनी पहिलं पाऊल उचललं होतं ते रस्त्यांचं डांबरीकरण करण्याचं ! अंबरनाथच्या रोटरी क्लबचे ते आधारस्तंभ होते. ते रोटरी क्लबचे अध्यक्ष असताना त्यांच्याच पुढाकारामुळे१९६८ साली महाराष्ट्रातला पहिला आणि देशातला दुसरा रोटरॅक्ट क्लब स्थापन झाला. ज्याचा पहिला अध्यक्ष ( चार्टर प्रेसिडेंट ) होण्याचा मान मला मिळाला होता! दादासाहेब म्हणजे आम्हा सर्वांना फ्रेंड , फिलॉसॉफर आणि गाईड वाटायचे. त्यांच्यासोबत मी एकदा रत्नागिरीला त्यांच्या घरीही जाऊन आल्याचं मला आठवतंय. उंचेपुरे, गोरेपान आणि तजेलदार व्यक्तिमत्त्व, उत्तम वत्तृत्व, अभ्यासू स्वभाव आणि समाजासाठी काही तरी भरीव कार्य करण्याची आत्यंतिक तळमळ हे त्यांचे गुणविशेष त्यांनी अखेरपर्यंत जपले ! त्यांच्या स्मृतीस अभिवादन ! - प्रवीण कारखानीस ९८६०६४९१२७