दादासाहेब नलावडे : एक उपेक्षित काँग्रेस नेते !

योगेश वसंत त्रिवेदी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक (yogeshtrivedi55@gmail.com/९८९२९३५३२१)



अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयाचा मी विद्यार्थी असल्याने त्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमाचा समूह तयार केला आहे. या समुहाद्वारे अंबरनाथ येथील घडामोडी कळत असतात. २२ मार्च २०२० हा दिवस भारताच्या द्रुष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिवशी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून महत्त्वाचा संदेश दिला होता. मी तो संदेश दुपारी ३.५१ ला समाज माध्यमातुन माझ्या निवडक मित्रपरिवार यांना कळविला. अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष आणि आमच्या परिवारात कौटुंबिक स्थान मिळविलेले श्री. प्रभाकर विठ्ठल उर्फ दादासाहेब नलावडे यांनी नेहमीप्रमाणे माझ्या संदेशाला त्याही दिवशी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी प्रतिसाद दिला. आणि साधारण दोनच तासात नको असलेली बातमी महात्मा गांधी विद्यालयाच्या समाज माध्यमातून समजली. अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष दादासाहेब नलावडे यांचे पुणे मुक्कामी निधन ! आणि मला एकदम धक्काच बसला. दादा पुण्यात त्यांचा सुपूत्र प्रशांत याच्या घरी गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास होते. मला कळलं की ते जीवनदायी यंत्रावर होते. नव्वदीच्या घरात असलेले दादासाहेब यांची स्मरणशक्ती उत्तम होती दादांच्या निधनाची बातमी कळताच अंबरनाथ मधील त्यांच्या सहवासातील सुमारे पन्नास वर्षांचा चित्रपटच झर्रकन डोळ्यासमोर आला. माझे वडिल वसंतराव त्रिवेदी आणि दादांचा तसा १९६० पासूनचा संबंध. वसंतराव त्रिवेदी हे नंदुरबार.धुळे येथन हरिजन सेवक संघाचे प्रचारक म्हणन अंबरनाथ येथे आले.अंबरनाथ येथील पश्चिमेला सुभाषवाडी (वांद्रापाडा) येथे हरिजन सेवक संघाचे समाज विकास मनोरंजन केंद्र आणि सभाष बालवाडी सा केली बाळकष्ण भट जगदीश दामले, दादासाहेब सरदार, डॉ. वि. भि. सरदार, शांताराम नाईक, काका पाटणकर यांच्या बरोबरच प्रभाकर विठ्ठल उर्फ दादासाहेब नलावडे, त्यांचे बंधू बाळ नलावडे (एकनाथ विठ्ठल नलावडे), अध्यात्म मार्गी डोळे गुरुजी, भाऊसाहेब केतकर, भाऊसाहेब परांजपे, डॉ. लक्ष्मण चिंतामण जठार, किसन शिंदे, सोमाशेठ आंग्रे, शांताराम जाधव, प्रभाकर जोशी. वसंतराव कर्णिक, मनोहर श्रीखंडे, पंढरीनाथ शिवराम रेगे, चंद्रकांत नाझरे, मुकुंदराय जोशी, शैलेंद्र भांडारे अशी अनेक मित्रमंडळी सानिध्यात आली. समाजसेवा, पत्रकारिता आणि राजकारण या क्षेत्रातील संचार आणि मग ओघानेच ११ जून १९६६ रोजी आहुति हे पाक्षिक वसंतराव त्रिवेदी यांनी सुरू केले आणि सहा महिन्यातच आहुति साप्ताहिक म्हणून सर्वाच्या सेवेत ।। समाजाय इदमन मम ।। हे ब्रीदवाक्य घेऊन रुजू झाले. अंबरनाथ चे राजकारण फारच मजेशीर होते.


तिथे काँग्रेस. शिवसेना, जनसंघ, समाजवादी, रिपब्लिकन असे अनेक पक्ष कार्यरत होते. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत मदनसिंह मनविरसिंह हे मनमिळाव काँग्रेस नेते जनता काँग्रेस या पक्षातर्फे उभे राहन गुलाबाच्या फुलाच्या निशाणीवर निवडन आले. पुरुषोत्तम वासुदेव उर्फ भाऊसाहेब परांजपे यांनी डॉ. ल. चिं. जठार आणि मित्रमंडळी सोबत शद्धाचार समितीच्या माध्यमातून निवडणक लढविली. नगरपालिका कार्यालयासमोर प्रवीण स्टोअर हे प्रभाकर नलावडे यांचे दुकान दादा आणि बाळ हे दोन्ही नलावडे बंधू हे स्टोअर चालवित असत. डोळे गुरुजी हेही या प्रवीण स्टोअर मध्येच कामाला होते. दादासाहेब नलावडे यांनी मदनसिंह यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. मदनसिंह निवडून आले पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक लागली. त्यावेळी म्हणजे १९७४ साली अंबरनाथ ला दादासाहेब नलावडे, कल्याण ला भगवानराव जोशी, डोंबिवली ला श्रीपाद राव उर्फ आबासाहेब पटवारी, भिवंडीला परशुराम टावरे, ठाण्यात सतीश प्रधान जनतेतून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मदनसिंह यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळाली नव्हती पण योगायोगाने दादासाहेब नलावडे यांना काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळाली होती. भाऊसाहेब पराजप हहा काग्रसच पण त्याना शुद्धाचार सामता स्थापन केली आणि नलावडे यांच्या विरोधात काम सुरु केले. दादासाहेब नलावडे हे नगराध्यक्ष म्हणून जरी निवडून आले असले तरी शुद्धाचार समितीचे बहुमत होते आणि पर्यायाने नलावडे यांना कामच करु द्यायचे नाही, असा समितीच्या लोकांनी चंग बांधला होता. दादासाहेब नलावडे यांनी रोटरी क्लब मध्ये काम केले असल्याने त्यांनी भारतीय जनसंघाच्या तिकीटावर निवडून आलेल्या एकमेव नगरसेवक पंढरीनाथ शिवराम रेगे उर्फ पंछी रेगे यांना जनसंघाची पणती विझवून काँग्रेस पक्षात आणले आणि उपनगराध्यक्ष बनविले. पंछी रेगे हे लायन्स क्लबमधून पुढे आलेले असल्याने एका अर्थाने अंबरनाथ चा कारभार हा रोटरी-लायन्स सारख्या उच्च विद्या विभूषित व्यक्तींच्या हाती सुरक्षित आला होता.


भाऊसाहेब परांजपे यांना नलावडे-रेगे या जोडीला कामच करु द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी बहुमताच्या जोरावर दिवसाला केवळ एक रुपयाच खर्च करण्याची परवानगी देणारा ठराव मंजूर करण्यात आला. नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खर्चासाठी केवळ एक रुपया दिवसाला देण्याची परवानगी म्हणजे निव्वळ थट्टा म्हणावी लागेल. तरीही सर्व राजकीय संकटांवर मात करुन प्रभाकर नलावडे यांनी अंबरनाथ चा चेहरा मोहराच बदलून टाकला. प्रभाकर (दादा) नलावडे नगराध्यक्ष असतांनाच शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेंव्हा त्यांना दादांनी अंबरनाथ ला आणले. साडेनऊशे वर्षे जुने प्राचीन शिवमंदिर तोपर्यंत विद्युतीकरणापासून वंचित होते. पण दादांनी शंकरराव चव्हाण यांना शिवमंदिरात नेले आणि हे । भोळाशंकर सांबसदाशिवाचे मंदिर विद्युतीकरणाच्या झगमगाटात न्हाऊन निघाले. दादांनी या शिवमंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी कंबर कसली आणि तिथेच त्या परिसरात कॅफेटेरिया, डॉर्मेटरी उभारली. अंबरनाथ लोहमार्गाजवळ पश्चिमेला नगरपालिकेच्या सफाई कामगारांना रहायला चांगली घरे मिळावीत म्हणून वसाहत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पण त्यातही कोलदांडा घालण्यात आला.


अखेर अर्धवट बांधकाम झाल्याने विटा चोरीला गेल्या. डॉ. भुजंगीलाल छाया या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ डॉ. बी. जी. छाय हॉस्पिटल उभारले. यशवंतराव माधवराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ खुले नाट्यगृह उभारले आणि त्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते करण्यात आले.. छाया हॉस्पिटलचे उद्घाटन मुंबईतील ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. बी. एन. पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. १९७४ ते १९७८ हा दादासाहेब नलावडे यांच्या नेतृत्वाखालील नगरपालिकेच्या कारकिर्दीतला काळ हा अक्षरश: सुवर्ण काळ च म्हणावा लागेल. शरद पवार यांनी १९७८ साली काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन समांतर काँग्रेस काढली आणि जनता पक्षाच्या मदतीने पुलोद सरकार स्थापन केले होते. त्या सरकारचे नगरविकास मंत्री हशू अडवाणी यांनी अंबरनाथ ला भेट दिली. त्यांनी दादासाहेब नलावडे यांच्या नेतृत्वाखालील अंबरनाथ नगरपालिकेच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली पण जेव्हा शरद पवार हे परदेशात गेले होते तेंव्हा हंगामी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार महसूलमंत्री नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या कडे होता. तेंव्हा संघाच्या/जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी उत्तमराव पाटील यांच्या कडे जाऊन "उत्तम काम करीत असलेली नगरपालिका बरखास्त करवून स्वत: चं "हशू(सू)" करवून घेतले. शिवसेनेचे शांताराम जाधव आणि आहुति चे वसंतराव त्रिवेदी हे दादासाहेब नलावडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. आहुति ने दादासाहेब नलावडे यांच्यावरील अन्यायाचा पाढा वाचणाया विशेष अंकांच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ आमदारांकडे कैफियत मांडली होती. तेव्हा काही नतद्रष्टांनी आहुति आणि आहुति कारांच्या बदनामी चे फलक लावले होते. अर्थात त्या निमित्ताने आहुति आणि आहुति कार अंबरनाथ च्या घराघरात पोहोचले आणि बदनामी करणायांचीच लोकांमध्ये छी थू झाली. दादासाहेब नलावडे यांच्या पत्नी शोभना ताई या ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या दादासाहेब नलावडे यांच्या घरी नेहमी येजा होत असे.


पण विधानसभा निवडणूक आली की मग पक्षाला डोंबिवली चे नकुल पाटील किंवा कल्याणचे सुदाम भोईर नाही तर संजय दत्त आठवायचे. भाऊसाहेब परांजपे आणि डॉ. बालाजी किणीकर सोडले तर अंबरनाथ करांवर बाहेरचेच उमेदवार लादण्यात आले. दादासाहेब नलावडे आणि विलासराव देसाई यांचा पक्षाने कधी विचारच केला नाही. निष्ठेने काम करणाया या नेत्यांच्या नशिबी बाकीच्या नेत्यांच्या पालखीचे भोई होण्याचेच आले. दादासाहेब नलावडे आणि विलासराव देसाई हे खरेतर अंबरनाथचे बावन्न कशी सोन्यासारखे नेतृत्व, अगदी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात स्थान पटकावू शकणारे हे नेते आयुष्यभर दुर्लक्षित राहिले, उपेक्षितच राहिले. दादा नंतर आयुष्याच्या संध्याकाळी चिरंजीव प्रशांतकडे पुण्याला राहिले. पायाला गँगरिन चा त्रास होता. पण २१ जून १९३० रोजी जन्मलेले प्रभाकर विठ्ठल तथा दादासाहेब नलावडे बुद्धी ने अखेरपर्यंत तल्लख होते. मी सामना मध्ये मुंबईत राजकीय वर्तुळात काम करीत असल्याने दादांना खास कौतुक होते. वरचेवर आम्ही अनेकदा चर्चा करीत असू. मला दादा बऱ्याच वेळा, अहो योगेशजी, पुण्यात या. तुमच्या बरोबर चिक्कार गप्पा मारायच्या आहेत, असं म्हणायचे. शेवटपर्यंत ते समाजमाध्यमाच्या द्वारे माझ्याशी संपर्कात होते. जागतिक पातळीवर थैमान घालणाया कोरोनाच्या सावटाखाली आपण असतांनाच दादांनी २२ मार्च २०२० रोजी इहलोकाला शेवटचा प्रणाम करीत पुण्यनगरीत देह ठेवला. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराला दादांनी नगरपालिकेच्या बोधचिन्हापासून सर्व संस्थांच्या शिरोभागी मानाचे स्थान मिळवून दिले त्या भोळाशंकर सांबसदाशिवाने दादासाहेब नलावडे यांच्या पुण्यात्म्याला चिरशांती मिळवून द्यावी, दादांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दादांच्या पवित्र स्मृतींना मानाचा मुजरा. दादासाहेब नलावडे सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सर्वच राजकीय पक्षांनी मानाचे पान द्यावे, एवढीच माफक अपेक्षा ! - योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१.