अंबरनाथमध्ये पहिले सामायिक भोजन कक्ष सुरु शासनाच्या पुढाकाराने सुरु झालेले पहिले भोजन कक्षः

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या पुढाकाराने आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्यातून सामायिक भोजन कक्ष सुरु झाले आहे. उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या हस्ते आणि तहसीलदार जयराज देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये हे सामायिक भोजन कक्ष सुरु झाले आहे. दुपारी तीन हजार आणि सायंकाळी तीन हजार भुकेलेल्याना हे जेवणाचे पाकीट देण्यात येत आहे. शासनाच्या पुढाकाराने सुरु झालेले हे पहीले सामुदायिक भोजन कक्ष आहे. पूर्वेकडील सूर्योदय सभागृहात हे सामायिक भोजन कक्षसुरु करण्यात आले आहे. शासनाच्या महसूल विभागाच्या पुढाकाराने आणि सेवाभावी संस्था यांच्या सहकार्यातून सामायिक भोजन कक्षात तयार होणारे अन्न पाकिटे करून ते गरजूपर्यंत पोहोचवले जाणार आहे. ज्या नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्य मिळत नाही अश्या कुटूंबियांप्रमाणे रोजंदारावर काम करणारे कामगार आणि बो घारांना विचनच्या माध्यमातून जेवण पुरवले जाणार आहे. उल्हासनगर येथील गुरुद्वार तसेच शहरातील विविध सामाजिक संस्था यांच्या सहकाऱ्याने हे सामायिक भोजन कक्ष सुरु केले आहे. ज्यांना जेवण मिळत नाही अशा अडकलेल्या बेरोजगार लोकांना तयार जेवण मिळावे म्हणून शासनाच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु केला. ज्यांना कोरोनाच्या या संचार बंदीच्या काळात जेवण मिळू शकत नाही किंवा ज्यांना स्वयंपाक करता येणे अशक्य आहे अशाना शासनाच्यापुढाकाराने आणि समाजसेवी संस्थांच्या मदतीने हा उपक्रम सुरु केला असल्याचे उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी सांगितले.


शहरातील पूर्व आणि पश्चिम भागात पाच ठिकाणी शासनाच्या महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सुरु केले असून म दिय सभागृहात तयार झालेले भोजन या पाच केंद्रांवर वाटप करण्यात येणार आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे अशानी अवश्य यात सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार जयराज देशमुख यांनी केले. सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नराळे, मुख्याधिकारी देविदास पवार, नायब तहसीलदार सुहास सावंत, निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार, सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुमती पाटील, मुरबाड औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष दिनेश अग्रवाल, संजय अग्रवाल, बंगाली संघाचे अध्यक्ष रॉय राणा, भाजपचे उपाध्यक्ष राजेश नाडकर, स्वच्छता दूत सलील जव्हेरी आदी यावेळी उपस्थित होते.