कल्याण (प्रतिनिधी) : वालधुनी आणि उल्हास नदीमधील वाढते प्रदूषण, जलपर्णी याकडे लक्ष वेधण्यासाठी वालधुनी नदी पर प्रभावित रहिवासी संघ तसेच उल्हास नदी बचाव कृती समिती यांनी दोन वेगवेगळे उपक्रम केले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. उल्हास नदीतील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सेक्रेड हार्ट शाळेच्या पंधरा विद्यार्थ्यांनी नदीत दीड किलोमीटरचे अंतर पोहन पार केले.
उल्हास नदीतील वाढत्या प्रदूषणावर मागील अनेक वर्षांपासून उल्हास नदी बचाव वृती समिती वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून वरप येथील सेक्रेड हार्ट शाळेच्या विद्यार्थ्यांनी या नदीच्या जतन आणि संवर्धनाकडे शासन आणि जनतेचे लक्ष वेधण्यासाठी सीमा रिसॉर्ट ते मोहना बंधाऱ्यापर्यंतचा भाग पोहून पार केला. या उपक्रमात शाळेच्या १५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मोहना बंधारा परिसरात उल्हासनगर शहरातन येणाऱ्या खेमाणी नाल्याचे पाणी थेट नदीत सोडले जाते. यामुळे या मावचे पानी से नदीत भागातील पाणी अत्यंत घाणेरडे आहे. याच्या परिणामी पोहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट काठापर्यंत पोहत येता आले नाही. त्यांना अग्निशमन दलाच्या होडीतून पाण्याबाहेर काढावे लागले. नेमक्या याच मुद्यावर नदी बचाव समिती शासनाचे लक्ष वेधू इच्छित असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र लिंगायत यांनी सांगितले. या उपक्रमामध्ये सेक्रेड हार्ट शाळेची अंध विद्यार्थिनी रोशनी पात्रा सहभागी झाली होती. तिच्या सहभागाबद्दल उपस्थितांनी तिचे कौतुक केले. या कार्यक्रमाला नदी प्रदूषण आणि संवर्धनात काम करणारे कर्जतचे मुकुंद पदण आणि संवर्धनात काम भागवत. सेक्रेड हार्ट स्कलचे संचालक एल्विन, नदी संवर्धनासाठी काम करणारे शशिकांत दायमा, शाळेतील शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका कस्तुरी देसाई तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कौस्तुभ देसाई या उपक्रमाला पालक म्हणन उपस्थित होते. उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने या उपक्रमाला सहकार्य करताना अग्निशमन विभागाने या बोटी व इतर साधने उपलब्ध करून दिली होती. ठाणे जिल्हातील लाखो नागरिकांची तहान भागवणारी उल्हास नदी अनेक कारणांनी प्रदषित होत आहे. तिच्या संवर्धनासाठी तसेच तिला प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. उल्हास नदी बचाव कृती समितीने या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत छोतली. कल्याण शहराजवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीचे आजचे स्वरूप एखाद्या नाल्यासारखे बालधुनी बीच आज झाले आहे. या ठिकाणी होणारे प्रदूषण, वाढते अनधिकृत भराव यावर नियंत्रण असावे यासाठी योगीधाम परिसरातील वालधुनी पूर प्रभावित रहिवासी संघाने सायन-लेथॉनचे आयोजन केले होते. या सायक्लेथॉन मध्ये शालेय विद्यार्थी तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. योगीधाम येथील साईबाबा मंदिर चौकातून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. भवानीनगर, घोलप नगर, अनुपम नगर, फॉरेस्ट कॉलनीयोगीधाम या परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. नदीतील अनधिकृत भरावावर नियंत्रण राखा, नदीचे प्रदूषण कमी करा अशा आशयाचे फलक यावेळी लावण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांना पुराचा फटका बसत आहे. २००५ च्या महापुरानंतर मिठी नदी प्राधिकरणाच्या धर्तीवर राज्य सरकारने वालधुनी नदी प्राधिकरणाची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात या विषयात अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या उपक्रमाद्वारे शासनाला या मुद्द्याची आठवण करून देण्याचा स्थानिकांचा एक प्रयत्न आहे, असे येथील स्थानिक नगरसेवक तसेच माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले. महापौर विनिता राणे शिवसेनेचे गटनेते दशरथ घाडीगावकर प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ संदीप जाधव वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुखदेव पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते.