हेरंब सेवा समितीचा उपक्रम
अंबरनाथ (प्रतिनिधी) : येथील प्रख्यात आणि जुन्या श्री हेरंब सेवा समितीच्या पुढाकाराने जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला. अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा, नगरसेविका सौ. वीणा उगले, सौ. शशिकला दोरुगडे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. भगवान चक्रदेव, शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले यांचे सह शहरातील शाळांचे शिक्षक, अंबरनाथचे नागरिक या सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांनीही अनेक उपकरण बनवून विज्ञानातील प्रगती दर्शवली होती. विद्यार्थ्यांमधील उत्साह ओसंडून वाहात होता. सौर ऊर्जा, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी जपणारे प्रकल्पांचा यात समावेश होता.