मुंबई (प्रतिनिधी) : ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त सद्गुरु वामनराव पै यांच्या प्रेरणेतून सुरु करण्यात आलेल्या जीवन विद्या मिशन तर्फे रविवार, ८ मार्च २०२० रोजी 'डॉक्टर तुमच्या भेटीला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. शिल्पा लाड आणि डॉ. विद्या जोशी यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात लाभणार आहे. महिलांच्या दैनंदिन जीवनातील आरोग्य विषयक समस्या, कौटुंबिक स्वास्थ्य, चाळीशी नंतर घ्यावयाची काळजी अशा अनेक विषयांवर मार्गदर्शनपर केवळ महिलांसाठी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मधुरम हॉल, गोखले शाळेच्या बाजूला, शिंपोली रोड, बोरीवली (पश्चिम) येथे सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. शिल्पा लाड या विश्वविख्यात रेडिओलॉजिस्ट आहेत तर डॉ. विद्या जोशी या MBBS असून गेली अनेक वर्षे त्या पॅक्टिस करतात, त्या उच्च विद्याविभूषित आहेत.
जागतिक महिला दिनानिमित्त जीवनविद्या मिशनचे 'डॉक्टर तुमच्या भेटीला'
• गिरीश त्रिवेदी