जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन संपन्न दोनहजारहून अधिक लोकांची प्रदर्शनास भेट

___ठाणे (जिमाका) : मुरबाड येथील मौजे सरळगाव येथे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे उदघाटन हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या प्रदर्शनाला दोन हजार हून अधिक लोकांनी भेट देवून प्रदर्शनाचा आनंदघेतला. ___या प्रसंगी बोलताना प्रकाश पाटील म्हणाले की पशुसंवर्धन विभागाने प्रचंड गर्दीचा उच्चांक दाखवून एक शेतकरी हितार्थ पशुधन क्रांती घडवली आहे. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या कार्यक्रमाला कृषि पशु दुग्धशाळा समिती सभापती किशोर जाधव, बांधकाम समिती सभापती वैशाली चंदे, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, सभापती दत्तू वाघ, उपसभापती अनिल देसले, जिल्हा परिषद सदस्य रेखा कंटे, दयानंद पाटील, काशीनाथ पष्टे, उल्हास बांगर, सुभाष घरत, सिमा घरत, चेतन घुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी मनोगत मांडताना सांगितले की पशुसंवर्धन हा ग्रामीण विकासाचा पहिला पाया आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन योजनेसाठी अधिक निधी देऊन शेतकरी कल्याणाचा हा पशुरथ पुढे नेईल. यावेळी गुणवंत अधिकारी व उत्कृष्ट पशुपालक यांचा सन्मान करण्यात करण्यात आला. वेगवेगळ्या जातीचे १७ श्वानांचा भव्य डॉग शो ने प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी वेगवेगळ्या जातीचे गायी, बैल, घोडे यांचे १०० स्टॉल मांडले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिलीपधानके यांनी केले.