बदलापूर (प्रतिनिधी) : बदलापूर पालिका हद्दीतील राज्य मार्ग क्रमांक ७६ मधील होप इंडिया कंपनी ते ज्युवेली तळपाडा येथे असलेल्या पुलापर्यंतचा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता हा पालिकेकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या संबंधीचा राज्य शासनाचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर असलेले खड्डे आणि अपूर्ण कामामुळे बदलापूर शहरातील नागरिक या रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड मानसिक त्रास सहन करत होते. मात्र आता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वार्ग झाल्याबरोबरच या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी साडेचौदा कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. बाद लाा र शहरातून अंबरनाथ कडून येणाऱ्या राज्य महामार्ग ७६ हा बदलापूर शहरातून बाहेर वांगणी कडे जाणारा संपूर्ण रस्ता आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरडीए यांच्याकडे वर्ग झाल्याने संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यातून प्रवास टाळता येणार आहे. खरवई ज्युवेली या भागात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी स्थानिकांकडून : जोरदार होत होती. याची दखल घेत स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन हा रस्ता आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. लवकरच या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार असल्याने नागरिकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
होप इंडिया ते सिमेंट काँक्रीटकरणासाठी साडेचौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार किसन कथोरे