जागतिक महिला दिन केवळ एक दिवसाचा नको : सिंधुताई सकपाळ

अंबरनाथ (मनीषा त्रिवेदी) : जागतिक महिला दिन केवळ वर्षातून एकच दिवस साजरा करून चालणार नाही. सध्या कुटुंबामध्ये ताणतणाव प्रचंड वाढत आहेत. हे ताण तणाव कमी करून कुटुंबामध्ये चांगले वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणून साजरा होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक | कार्यकर्त्या सिंधुताई सकपाळ यांनी केले.



प्रेरणा सामाजिक महिला मंडळाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंबरनाथ शहरातील विविध क्षेत्रात गौरवास्पद कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी आपल्या मनोगतात वरील प्रतिपादन सिंधुताई सकपाळ यांनी केले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तुळशीराम चौधरी, भाजपच्या ठाणे जिल्हा ग्रामीण महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सरिता प्रेरणा सामाजिक महिला मंडळाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंबरनाथ शहरातील विविध क्षेत्रात गौरवास्पद कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी आपल्या मनोगतात वरील प्रतिपादन सिंधुताई सकपाळ यांनी केले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तुळशीराम चौधरी, भाजपच्या ठाणे जिल्हा ग्रामीण महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सरिता चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्त्री नाही तर जीवनात काहीच नाही असे सागून सिंधुताई सकपाळ म्हणाल ड्याचा मांडा करायला बाई कडूनच शिकले, बाप हा रात्रीच्या अंधारातील दिवा असतो तर जखम कुरवाळणारी हि आई म्हणजेच स्त्री असते असे सिंधुताई म्हणाल्या. दु:ख हे आयुष्यात येतच असते. दुखणे माणूस बळकट होत असतो. म्हणून दु:खाचे कायम स्वागत करण्याचे आवाहन सिंधुताई सकपाळ यांनी यावेळी चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्त्री नाही तर जीवनात काहीच नाही असे सागून सिंधुताई सकपाळ म्हणाल ड्याचा मांडा करायला बाई कडूनच शिकले, बाप हा रात्रीच्या अंधारातील दिवा असतो तर जखम कुरवाळणारी हि आई म्हणजेच स्त्री असते असे सिंधुताई म्हणाल्या. दु:ख हे आयुष्यात येतच असते. दुखणे माणूस बळकट होत असतो. म्हणून दु:खाचे कायम स्वागत करण्याचे आवाहन सिंधुताई सकपाळ यांनी यावेळी बोलताना केले. मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात त्याचे नाव महाराष्ट्र अशी खंत वजा टीका सिंधुताई सकपाळ यांनी आपल्या मनोगतात यावेळी व्यक्त केली. ज्यावेळी बाहेरचे दिवे विझू लागतात त्यावेळी तुम्ही आतून पेटून उठा. तुमचा उजेड तुम्हीच बोलताना केले. मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात त्याचे नाव महाराष्ट्र अशी खंत वजा टीका सिंधुताई सकपाळ यांनी आपल्या मनोगतात यावेळी व्यक्त केली. ज्यावेळी बाहेरचे दिवे विझू लागतात त्यावेळी तुम्ही आतून पेटून उठा. तुमचा उजेड तुम्हीच निर्माण करा असे आवाहन उपस्थित महिलांना सिंधुताई सकपाळ यांनी केले. नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर, कल्याणच्या नगरसेविका खुशबू चौधरी, मुरबाडच्या नगराध्यक्षा सौ. छाया चौधरी, बदलापूरच्या उपनगराध्यक्षा सौ. राजश्री निर्माण करा असे आवाहन उपस्थित महिलांना सिंधुताई सकपाळ यांनी केले. नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर, कल्याणच्या नगरसेविका खुशबू चौधरी, मुरबाडच्या नगराध्यक्षा सौ. छाया चौधरी, बदलापूरच्या उपनगराध्यक्षा सौ. राजश्री घोरपडे, मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्या पत्नी सौ. अंकिता पाटील, दत्ता देशमुख, सुभाष साळुके, सौ. सुवर्ण साळुके, खानजी धल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. घोरपडे, मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्या पत्नी सौ. अंकिता पाटील, दत्ता देशमुख, सुभाष साळुके, सौ. सुवर्ण साळुके, खानजी धल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.